चला QR कोड बनवूया .....






माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माहितीच्या सुयोग्य व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व आलेले आहे .QR कोडचा त्यासाठी चांगला उपयोग होतो.
           आपल्या ' महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ,पुणे '. यांनी नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये QR कोडचा वापर केलेला आहे. पाठ्यपुस्तकातील त्या कोडच्या सहाय्याने प्रत्येक पाठाच्या विषयी विविध E- मजकूर , E- साहित्य आपल्याला उपलब्ध करून दिले आहे . म्हणजेच साठवलेली भरपूर  E-माहिती आपल्याला QR कोडच्या मदतीने इतरांपर्यंत पोहचवता येते.
             तुम्हीही तुमच्याकडील E-माहिती( उदा. google drive , blog , dropbox  इ. मधील ) QR कोड तयार करून इतरांपर्यंत सहज पोहचवू शकता . चला तर मग QR कोड कसा बनवतात ते शिकूया ......

प्रथम वेब ब्राउझर ओपन करा.


वेब ब्राउझरच्या सर्च बॉक्समध्ये qr code genrator  असे लिहून सर्च करा. खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.



वरील स्क्रीनमध्ये लाल रंगाने दर्शविल्याप्रमाणे दोन नंबरच्या सर्च रिझल्टला क्लिक करा. आता खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.



वरील स्क्रीनमध्ये वरच्या बाजूला पहा .FREE TEXT , URL , CONTACT , PHONE  हे ऑप्शन दिसतात .( समोरच्या  > या चिन्हाला क्लिक केल्यावर अधिक ऑप्शन दिसतील ) 
१)- आता असे  समजा की तुम्हाला काही मजकूर लिहून त्या मजकुराचा QR कोड तयार करायचा आहे  तर तुम्ही वरील FREE TEXT ला क्लिक करा. यानंतर खाली Enter text to share here असे लिहिले आहे तेथे कर्सर नेऊन क्लिक करा व आपल्याला जो मजकूर लिहायचा आहे तो तेथे लिहा .(तुम्ही लिहित असताना जस-जसे  अक्षरे, शब्द लिहाल तसा समोर दिसणाऱ्या  QR कोडमध्ये बदल झालेला तुम्हाला स्क्रीनवरच दिसेल.)
२) त्याच पद्धतीने पुढे असणारे URL, CONTACT , PHONE इ. यांविषयीचा QR कोड तयार करावयाचा असेल तर हव्या त्या पर्यायाला क्लिक करून खाली दिसणाऱ्या  Enter text to share here ला क्लिक करा व आपला मजकूर लिहा अथवा पेस्ट करा .
३) मला माझ्या ब्लॉगच्या  URL चा  QR कोड तयार करायचा आहे त्यामुळे मी वरीलपैकी  URL या ऑप्शनला क्लिक करतो व खाली  Enter text to share here असे लिहिले आहे तेथे कर्सर नेऊन क्लिक करतो आणि मी अगोदर कॉपी केलेला माझ्या ब्लॉगचा URL तेथे पेस्ट करतो . खालील स्कीनमध्ये पहा त्याप्रमाणे ...



आता वरील उजवीकडे दिसणाऱ्या  SAVE  या बटनाला क्लिक करू . त्यानंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.



आता आपण तयार केलेला QR कोड आपण save करू . त्यासाठी filename  लिहिले आहे तेथे कर्सरने क्लिक करा व आपल्याला हवे असणारे नाव द्या. त्यानंतर खालील ऑप्शनमधून  ज्या format मध्ये आपल्याला तयार केलेला   QR कोड save करून ठेवायचा आहे तो format निवडा मला   PNG  निवडावयाचा असल्याने मी PNG ला क्लिक केले आहे. आता खालच्या SAVE या बटनावर क्लिक करा.

खालील SEVE बटनावर क्लिक केल्यानंतर सदर  QR कोड ची फाईल आपल्या संगणकामध्ये डाउनलोड होईल . संगणकाच्या डाउनलोड विभागात जाऊन ती फाईल पहा , प्रिंट करा अथवा इमेल इ. माध्यमातून इतरांना  कोड शेअर करा. 

                                            धन्यवाद ..........................

                 आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले आभार ..........



No comments:

Post a Comment