चला मोबाईलची स्क्रीन laptop वर घेऊया (mirroring)






आपणास वेगवेगळ्या तांत्रिक कामांसाठी मोबाईलची स्क्रीन laptop वर घेणे आवश्यक वाटते . त्यास ' मोबाईल स्क्रीन मिररिंग ' असे म्हणतात . मोबाईलची स्क्रीन laptop वर घेण्याचे अनेक मार्ग आहेत .त्यापैकी मला सर्वात सोपा वाटलेला मार्ग खालीलप्रमाणे आहे .

➤ प्रथम आपल्या मोबाईलमध्ये AirDroid हे App प्ले स्टोरमधून  install करून घ्या .
➤आता मोबाईल व laptop चे इंटरनेट व hotspot बंद करा 
➤आता प्रथम मोबाईलचे फक्त hotspot सुरु करा .
➤यानंतर आता laptop चे Wi-Fi सुरु करून मोबाईलच्या hotspot ला कनेक्ट करा .
➤मोबाईलमधील  AirDroid   हे App ओपन करा .खालील प्रमाणे मोबाईलमध्ये स्क्रीन दिसेल .
➤मोबाईल स्क्रीन मधील पहिल्या (AirDroid Web) ऑप्शनला क्लिक करा . आता मोबाईल स्क्रीनवर आपल्याला IP address दिसेल .
➤आता laptop वरील कोणताही वेब ब्राउझर ओपन करा.

➤सर्च बारमध्ये मोबाईलवर दिसणारा IP address टाईप करा आणि Enter करा .
➤यानंतर मोबाईल वर एक सूचना येईल ती Accept करा .
➤आता laptop वर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल.

➤laptop स्क्रीनच्या डाव्या बाजूला App आयकॉन दिसतात त्यामधील screenshot आयकॉनवर क्लिक करा .
➤मोबाईलवर  सूचना येईल Start Now ला क्लिक करा .
➤आता मोबाईलची स्क्रीन laptop वर दिसेल ती मोठी करून घ्या .
➤मोबाईलमधील AirDroid  app क्लोज न करता मोबाईलचे मधले बटन (स्क्रीन टच ) दाबून back जा .
➤ आता आपण मोबाईलचे नेट सुरु करून आपणाला हवे ते कार्य online ही करू शकता .


आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ...................


1 comment: