आपणास हवी असणारी माहिती संबंधित व्यक्तींकडून google form च्या मदतीने आपण कमी वेळात मिळवू शकतो . कागद व वेळेची बचत होते .
चला तर मग शिकू या गुगल फॉर्म बनविणे .
➤ आपल्या मोबाईल मधील अथवा संगणकातील वेब ब्राउझर मधून www.google form हा URL सर्च करा .
खालील प्रमाणे पेज ओपन होईल .
➤वरीलपैकी पहिला सर्च ऑप्शन निवडा त्यानंतर खालील प्रमाणे पेज ओपेन होईल .
➤Go to Google form वर क्लिक करा .खालील प्रमाणे पेज ओपेन होईल.
➤ वरीलप्रमाणे पेज ओपेन झाल्यावर आपणास हवा तो नमुना निवडा .मी पहिला अर्थात Blank हा नमुना निवडतो . Blank हा नमुना निवडल्यावर खालीलप्रमाणे पेज ओपन होईल .
➤आता Untitled form ला Backspace करून त्याच्या जागेवर आपणास हव्या असणाऱ्या माहितीचा विषय अथवा प्रश्न टाईप करा . मला शिक्षकांची माहिती संकलित करायची असल्याने मी शिक्षक माहिती असे लिहितो .➤खाली डीस्क्रीप्शन लिहा. मी ' सर्व माहिती मराठीत लिहा '. असे डीस्क्रीप्शन लिहितो.कारण मला शिक्षकांकडून मराठीत माहिती संकलित करावयाची आहे .आता आपला फॉर्म खालील प्रमाणे दिसेल
.
➤ आता Untitled Question ला Backspace करून त्या जागी आपला प्रश्न अथवा हव्या असणाऱ्या माहितीचा विषय लिहा . मला प्रथम शिक्षकाचे नाव हवे असल्याने मी ' शिक्षकाचे नाव ' असे लिहितो . आपणास लिंकवर माहिती भरणाऱ्या शिक्षकांनी कशा स्वरुपात माहिती देणे अपेक्षित आहे त्यासाठी समोरच्या Multiple Choice या बटनाला क्लिक करून ऑप्शन निवडावा . त्यासाठी खालील स्कीन पहा .
➤ मला शिक्षकांनी पूर्ण नाव लिहावे असे अपेक्षित असल्याने मी पहिलाच म्हणजे Short answer हा ऑप्शन निवडतो . त्यानंतर शेजारीच दिसणाऱ्या उभ्या टूलबार मधील अधिकच्या ' + ' च्या चिन्हाला क्लिक करून आपणास हवा असणारा नवीन प्रश्न Untitled Question ला Backspace करून लिहावा . मला आता दुसरी माहिती शिक्षकांची सेवा सुरु तारीख ही हवी असल्याने मी ' सेवा सुरु तारीख असे लिहिले आहे '. व समोरील Multiple choice या बटनाला क्लिक केले आहे . आता संगणकाची स्क्रीन खालील प्रमाणे दिसेल .
➤मला शिक्षकांकडून सेवा सुरु तारीख हवी असल्याने मी Multiple choice मधील ऑप्शन पैकी Date या ऑप्शन ला क्लिक करतो . त्यानंतर पुढील प्रश्नासाठी पुन्हा बाजूच्या उभ्या टूलबारमधील अधिक + या चिन्हाला क्लिक करतो .
➤आता Untitled Question ला Backspace करून त्याच्या जागी आपणास हव्या असणाऱ्या माहितीचा विषय अथवा प्रश्न लिहा. मला शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती संकलित करावयाची असल्याने मी 'शैक्षणिक पात्रता ' असे लिहितो . व उजव्या बाजूकडील Multiple choice या बटनाला क्लिक करतो .आता स्क्रीन खालीलप्रमाणे दिसेल .
➤ आता शैक्षणिक पात्रतेची माहिती मला शिक्षकांनी आपणास लागू असलेला पर्याय निवडावा अशा स्वरुपात हवी आहे त्यासाठी मी वरील स्क्रीन मधे पहा . मी तीन क्रमांकाचा Multiple choice हा पर्याय निवडतो . वरील स्क्रीन प्रमाणे तीन क्रमांकाचा Multiple choice हा पर्याय क्लिक केल्यावर पर्यायांची विंडो स्क्रीनवरून जाईल .
➤ आता option 1 च्या जाग्यावर मी 'उच्च माध्यमिक ' असे लिहितो . आता त्याखालील Add option ला क्लिक करून (ADD OTHER ला नाही ) पदवीधर असे लिहितो .पुन्हा खाली Add option ला क्लिक करून 'या पेक्षा अधिक ' हा तिसरा ऑप्शन लिहितो . खालील स्क्रीन पहा .
➤ आता मला शिक्षकांची व्यावसायिक पात्रता याविषयीची माहिती हवी असल्याने मी पुन्हा उजव्या बाजूकडील उभ्या टूलबार मधील अधिक + च्या चिन्हाला क्लिक करून नवीन प्रश्न निवडतो . Untitled Question च्या जागी ' व्यावसायिक पात्रता (प्राप्त असणाऱ्या पदविका / पदवी निवडा ) ' असे लिहितो . व त्यासमोरील Multiple choice या बटनावर क्लिक करतो . आता स्क्रीन खालील प्रमाणे दिसेल .
➤मला शिक्षकांचा प्रतिसाद आपणास लागू असणारे पर्याय निवडा अशा स्वरूपाचा हवा असल्याने मी ( वरील स्क्रीन पहा ) Checkboxes हा चार क्रमांकाचा पर्याय निवडला आहे . Option 1 ला Backspace करून त्याच्या जागी डी .एड. लिहिले आहे व Add option चा उपयोग करून अनुक्रमे बी.एड. , एम.एड. , एम.फील. , पी.एच.डी. हे पर्याय समाविष्ट केलेले आहेत . खालील स्क्रीन पहा .
➤ प्रत्येक प्रश्न / विषय समाविष्ट केलेनंतर स्क्रीनच्या वरच्या भागात उजव्या बाजूला काही चिन्ह दिसतात त्यामधील डोळ्यासारखे दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक करून आपण आपला google form कसा तयार झाला आहे याचा preview पाहू शकतो.
➤आपणास ज्या प्रश्नांना / विषयाला प्रतिसाद अनिवार्य करायचा आहे त्या प्रत्येकाच्या खालील Required बटनाला ऑन करा .
➤ आता आपला google form तयार झाला आहे . वरच्या भागातील उजव्या बाजूच्या ' SEND ' या बटनावर क्लिक करा . खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल . आपणास हवा असणारा पर्याय निवडा . मला या Google form ची लिंक कॉपी करून शिक्षकांच्या Whats App ग्रुपवर शेअर करायची आहे व अगदी थोड्या वेळेत माहिती कलेक्ट करावयाची आहे त्यामुळे मी साखळीच्या कडीसारखे दिसणाऱ्या चिन्हाला( लिंक चिन्ह) क्लिक करतो .
➤ आता खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल .
➤Shorten URL च्या चेक बोक्सला क्लिक करून लिंक शोर्ट करा व शेअर करा.
➤ आपणाला google form च्या मदतीने एक्सल मधे माहिती मिळते .
धन्यवाद........
No comments:
Post a Comment