➤सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांच्या शाळेचे संकेतस्थळ तयार झालेले असून ते सर्व जनतेसाठी खुले आहे .आपणास ते बघावयाचे असल्यास व ते अपडेट करावयाचे असल्यास आपण ते करू शकतो. ( अपडेट करावयाचे अधिकार मुख्याध्यापकांचे )
कोणीही नागरिक त्यास हव्या त्या शाळेच्या संकेतस्थळाला भेट देऊन संकेतस्थळावर शाळेने प्रसिद्ध केलेली माहिती पाहू शकतो ( फक्त यु-डायस नं. आवश्यक) .
➤➤चला तर मग जाणून घेऊ या आपल्या शाळेचे संकेतस्थळ कोठे आहे ?
➤ प्रथम वेब ब्राउझर ओपन करून www.education.maharashtra.gov.in असे सर्च बारमध्ये लिहा व सर्च करा.
आता खालीलप्रमाणे पेज ओपन होईल .
➤पहिल्या सर्च ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.
➤यानंतर school / शाळा ( आपण सेट केलेल्या भाषेप्रमाणे ) या पहिल्या ऑप्शनला क्लिक करा.आता खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.
➤ (नोटीस विंडो क्लोज करा.) वरील मेनुबारमधील सातव्या क्रमांकाच्या school website या मेनूला क्लिक करा . खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.
पहिल्या बॉक्समध्ये यु-डायस नं.लिहा व पुढील view school website वर क्लिक करा . आता खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.
➤ वरील पेज हे तुम्ही यु-डायस नं. टाईप करून सर्च केलेल्या शाळेच्या संकेतस्थळाचे होम पेज आहे. कोणीही व्यक्ती यु-डायस नंबरच्या सहाय्याने त्यास हव्या त्या शाळेच्या संकेतस्थळाला भेट देऊन शाळेने जनतेसाठी प्रसिद्ध केलेली माहिती पाहू शकते .
➤➤ चला तर मग आता जाणून घेऊ या आपल्या शाळेचे संकेतस्थळ आपण अपडेट कसे करावयाचे .
➤प्रथम login बटनाला क्लिक करा.(वरील स्क्रीन पहा.) त्यानंतर user id , password , captcha code च्या मदतीने login करा .त्यानंतर खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.
➤वरील पेजमध्ये home सह एकूण १४ मेनूबार आहेत .त्यामध्ये आपण शाळेची माहिती उपलोड करू शकतो,
प्रत्येक पेजचा format फिक्स आहे . त्याप्रमाणे आपल्याला प्रसिद्ध करावयाची माहिती अपलोड करावयाची आहे . प्रत्येक मेनू /सबमेनूमध्ये अपलोड केलेली माहिती संकेतस्थळावर कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत उपलब्ध असावी या बाबी आपण सेट करावयाच्या आहेत. प्रत्येक पेजवरील माहिती अपलोड करून झालेनंतर submit करावी .
१) disply -
notice board- यामध्ये आपण शालेय कामकाजाबाबतच्या विविध सूचना प्रसिद्ध करू शकतो.
news - या सबमेनुमध्ये शाळेतील विविध कार्यक्रम , स्पर्धा , उत्सव इ. बातम्या प्रसिद्ध करू शकतो.
Our moto & vision - यामध्ये आपल्या शाळेचे ध्येय नमूद करावे.
Quotes -यामध्ये आपण सुविचार ,काही प्रेरणादायी वाक्य लिहिने अपेक्षित आहे.
२) Activities for society - यामध्ये आपल्या शाळेमार्फत अथवा सहभागाने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती लिहावी .फ्होतो अपलोड करू शकता .
meeting proceeding - यामध्ये शालेय समित्यांच्या मिटिंगचे इतिवृत्त लिहावे .
summary of mitting - यामध्ये मिटिंगचा थोडक्यात गोषवारा लिहावा.
३) photos - या मेनूमध्ये शाळेच्या विशेष कार्यक्रमाचे यशोगाथेचे fhoto अपलोड करावेत .
४) send SMS - या मेनूमधून आपण शालेय समितीच्या सदस्यांना मिटींगची सूचना ( अजेंडा ) , त्याचबरोबर शाळेबाबतचा आवश्यक इ- पत्रव्यवहार करू शकतो . massage टाईप करून send केल्यावर सर्व सदस्यांना पोहचतो.( आपण school portal वर उपलोड केलेल्या यादी व फोन नं. प्रमाणे )
५)prospectus - यामध्ये आपण आपल्या शाळेचे माहितीपत्रक तयार करून अपलोड करणे अपेक्षित आहे.
६)Achievments - यामध्ये शाळेने साध्य केलेल्या संपाद्नुकीची महीति अपलोड करावी
७)Exam - यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक अपलोड करावे.
८)Emargency contact - यामध्ये हॉस्पिटल , पोलीस स्टेशन , फायर ब्रिगेड इ. आपत्कालीन सुविधांचे नंबर अपलोड करावेत.
९)HM information - यामध्ये लोगो , मुख्याध्यापक फोटो , नाव संकेतस्थळ थीमचा रंग , संकेतस्थळाची भाषा याबाबी सेट करावयाच्या आहेत.
१०) Subject taught - आपल्या शाळेत शिकवले जाणारे विषय नमूद करावेत.
११)Time table - शालेय वेळापत्रक ( तसिकानिहाय ) उपलोड करावे.
१२) calendar - यामध्ये सुट्यांच्या यादीप्रमाणे माहिती उपलोड करावी.
१३) fhoto upload - यामध्ये क्रीडांगण , इमारत यांचे फोटो अपलोड करावेत .
वरीलप्रमाणे प्रत्येक मेनुची माहिती सबमिट करावी.
धन्यवाद ...........................................
आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे ......
No comments:
Post a Comment